नागरी सहकारी पतसंस्था शाखा आरमोरी तर्फे आदरांजली
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):आरमोरी येथे दि.18/9/2024ला स्व. प्रा.खुशालराव वाघरे यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त दि.गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था शाखा आरमोरी तर्फे आदरांजली वाहण्यात आली.
स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रंजितभाऊ बनकर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून निमजे सर,कैलास खोब्रागडे, आशिष चिलबुले,नरेश नवघडे, दहिकर ,विलास मेश्राम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजित बनकर यांनी दिवंगत प्राचार्य वाघरे यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक,सहकार व आर्थिक क्षेत्रातील कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
कार्यक्रमाचे संचालन शाखा व्यवस्थापक ताराचंद वाघरे यांनी करून उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.








