सिताबर्डी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर केले वृक्षारोपण

426

बहुसंख्य बर्डीवासीय नागरिकांची उपस्थिती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी,१५ आॅगस्ट २०२४: स्थानिक बर्डी परिसरातील नागरिकांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पावनपर्वाचे औचित्य साधून सिताबर्डी परिसरातील आरमोरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दिनांक १५ आॅगष्टला विविध प्रजातीची झाडे लावली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत तुकाराम महाराज यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे’ या अभंगाची महती विशद केली.तसेच वृक्षारोपण केलेल्या वृक्षांचे वर्षभर जतन व संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली.

वृक्षारोपण करतांना सौ.मेघा मने, पोलीस पाटील सरिता नैताम,निशा पेटकुले, अस्मिता ढोरे,छाया मानकर,महेंद्र शेंडे,प्रमोद सेलोकर, अरूण लठ्ठे,नानाजी चोपकार, अरुण चोपकार, शामराव भोयर,हरी शेंडे, गुणवंत गोंदोळे, प्रभाकर माकडे,गिरीधर सेलोकर,कुणाल भरणे,अंकीत मने व बहुसंख्य बर्डीवासीय नागरीक उपस्थित होते.