गोंडवाना अस्मितादर्श पुरस्काराने डॉ.आशिष कोरेटी गौरवान्वीत

423

निष्काम समाजसेवेची घेतली दखल

गोंडवाना विकास मंडळ नागपूरचा पुढाकार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी/नागपूर,दि.१६ आॅगस्ट २०२४: दिनांक १५ आॅगस्ट २०२४ रोज़ी गोंडवाना विकास मंडळ नागपूर मंडळाद्वारे स्वातंत्र दिन आणि व्यक्तिविशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.आशिष कोरेटी यांच्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची दखल घेऊन मंडळाचे वतीने विशेष समारंभात ‘गोंडवाना अस्मितादर्श पुरस्कार ‘ देऊन त्यांना गौरविले.

डॉ. आशीष मनोहरराव कोरेटी, यांनी 53 वेळा रक्तदान करुन समाजात अलौकिक नाव प्राप्त केले आणि 2013 पासून आदिवासी बहूल व नक्षल प्रभावित धानोरा , कुरखेडा , कोरची आणि नागपुर जिल्ह्यातील रामटेक क्षेत्रातील अतिदुर्गम आदिवासी भागात आतापर्यंत 256 वेळा “अतिविशेष आरोग्य शिबीर “ व चश्मे वाटपाचे उपक्रम राबविले आहेत.

यावेळी डॉ.आशिष कोरेटी यांनी भाषणामध्ये रक्तदानाचे महत्व आणि पावसाळ्यांत होणारे साथीचे आजार यावर प्रकाश टाकला .तसेच मला मिळालेला हा मौल्यवान पुरस्कार माझ्या कार्याची पावती असून पुनश्च समाजाप्रती असलेल्या जाणिवेचे भानही आहे.त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढलेली आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शीतल मरकाम (अध्यक्ष-गोंडवाना विकास मंडळ ),तर प्रमुख अतिथि म्हणून श्रीमती मुक्ताताई कोकडे ( अध्यक्ष – जिल्हा परिषद नागपूर ) ,उदघाटक नीतिन इसोकर ( प्रकल्प अधिकारी – नागपूर) , डॉ नरेंद्र कोडवते ( से.नी. सर्जन) , डॉ पुरुशोत्तम मडावी (डेप्युटी डायरेक्टर – आरोग्य, नागपूर) , राजे वासुदेवशहा टेकाम , शंकरराव काटेंगे ( सेवानिवृत्त, सहायक मैनेजर – रिज़र्व बैंक नागपूर) ,संभाजी सलामे ( से.नी. RTO), शिवराम भलावी (से.नी. IFS ), दिनेशकुमार गेडाम , दिलीप मडावी , डॉ श्याम कोडापे ( प्राध्यापक – VNIT ) आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.कोरेटी यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा,कोरची, धानोरा तालुक्यातील जनतेने व मित्रमंडळीनी अभिनंदन केले आहे.