भरती पूर्व प्रशिक्षणार्थी पोलीस भरतीत पात्र
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली)/दि.१५ आॅगस्ट २०२४:आरमोरी शहरात सुरू असलेल्या भारत स्पोर्ट्स अकॅडमी, आरमोरी तर्फे मागील ५ महिन्यापासून पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.यातील तीन पुरुष व एक महिला गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीसाठी पात्र ठरले आहेत.पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
या पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील ४० विद्यार्थ्यांनी भरभरून सहभाग घेतला होता.
भारत स्पोर्ट्स अकॅडमी, आरमोरी चे संचालक महेंद्र मने यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पुरुष गटातील उमेदवारांसाठी १६०० मीटर रनिंग गोळाफेक (वजन ७किलो ५०ग्रॅम), १०० रनिंग तर महिला गटातील उमेवारांसाठी 800 मीटर रनिंग गोळाफेक(४किलो) 100 मीटर रनिंग चे प्रशिक्षण देण्यात आले होते या पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणात प्रशिक्षण घेऊन अरसोडा येथील तुषार रामदास शिलार , रवी येथील राकेश प्रभू शिलार , आरमोरी येथील विकास कृष्णा धांडे, प्रशांत सोरते ,आरमोरी येथील वृषाली चाटारे यांची गडचिरोली जिल्हा पोलीस मध्ये निवड झाली आहे.निवड झालेल्या या सर्व उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन व माल्यार्पण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यशस्वी झालेल्या उमेदवारांनी आपल्या निवडीचे श्रेय पालक व भारत स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक महेंद्र मने यांना दिले आहे.
यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









