आरमोरी येथे स्व.वामनरावजी वनमाळी नाॅलेज सिटीत विविध कार्यक्रमांचे आयोजन १० आॅगस्टला

187

रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर व दिव्यांगांना मदत

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित महात्मा गांधी महाविद्यालयात दिवंगत संस्थापक किशोरभाऊ वामनरावजी वनमाळी यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित दि.१० आॅगस्ट २०२४ रोजी सेवा दिवस म्हणून पाळण्यात येत आहे.त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सकाळी १०.१५ ते १०.३० वाजता पुतळ्यांचे माल्यार्पण,१०.३०ते ११ वाजता श्रध्दांजली अर्पण कार्यक्रम, सकाळी ११ ते १२ वाजता दिव्यांगांना साहित्य वाटप, सकाळी १२ ते .. रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.

सदर कार्यक्रमास नागरिकांनी, पालकांनी उपस्थित राहून शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन मनोहरभाई शिक्षण मंडळाचे सचिव मनोज वनमाळी व संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक आदींनी केले आहे.