बहुसंख्य शिक्षक, पालकांची उपस्थिती
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली)/दि.९ आॅगस्ट २०२४:मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरी द्वारा संचालित महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, आरमोरी येथे दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोज गुरुवार ला शिक्षक – पालक संघाची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती.यात शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पालक संघ
यावेळी शिक्षक पालक संघाचे अध्यक्षपदी प्राचार्य साईनाथ अद्दलवार , उपाध्यक्ष- उमेश मारोती हर्षे तर सचिवपदी प्रा. विक्रांत मने, सहसचिव म्हणून मनोज वसंतसिंह पवार, चांगदेव खुशाल सोरते, महिला प्रतिनिधी म्हणून सौ. सुष्मा रवींद्र कोतकोडावार आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महात्मा गांधी विद्यालय शिक्षक पालक संघ
अध्यक्षपदी प्राचार्य साईनाथ अद्दलवार , उपाध्यक्ष- विलास गोंदोळे तर सचिवपदी – हेमंत निखारे, सहसचिव – सुरेश आंबोने, महिला प्रतिनिधी म्हणून सौ. अनिता लठ्ठे, सौ. सुष्मा भांडारकर,सौ. शारदा वारजूरकर आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विद्यालयातील पालकांचा अतूट विश्वास असल्यामुळे वर्षभरातील विविध शालेय उपक्रमात हिरहिरीने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे सलग तिसऱ्यांदा शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली.हे विशेष!
निवड झालेल्या मान्यवरांनी शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षी शालेय बाबींमध्ये हिरहिरीने सहभागी होऊन उच्च दर्जाचे शिक्षण व गुणवत्ता तसेच शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सहकार्य करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक विरेंद्र गुंफावार यांनी केले.तर सुत्रसंचालन हेमंत निखारे व आभार प्रा.कानझोडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका , प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.








