आरमोरी तालुका अध्यक्षपदी इंजि.चेतन भोयर यांची फेरनिवड
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली:राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे महाधिवेशन ७ ऑगस्ट २०२४ ला अमृतसर, पंजाब येथे आयोजित केले आहे. त्या निमित्ताने गडचिरोली येथील कमल केशव सभागृह, कात्रटवार काॅम्प्लेक्स येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक व नवनियुक्त पदाधिकारी यांची नियुक्ती करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
याप्रसंगी ओबीसी संघटनेत सक्रिय सहभाग नोंदविणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आरमोरी तालुका सचिव मिथुन शेबे यांना बढती देऊन यांची नियुक्ती राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या जिल्हा सचिव पदी करण्यात आली.तर इंजि.चेतन भोयर यांची महासंघाचे आरमोरी तालुकाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.
त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, युवा जिल्हा अध्यक्ष राहुल भांडेकर यांना दिले.
त्यांच्या नियुक्तीबद्दल मिलींद खोब्रागडे, चेतन भोयर, हरिष नैताम, निशिकांत नैताम व ओबीसी प्रवर्गातील मित्रमंडळी आदींकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









