युवारंग संत महापुरुषांच्या विचारावर चालणारे संघटन:- विलास गोंदोळे
विविध युवा सामाजिक विचारवंत, कार्यकर्ते व पालकांची मांदियाळी
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):नेहमी क्रीडा, आरोग्य,सांस्कृतिक,सामाजिक,शैक्षणिक,पर्यावरण संरक्षण ,महिला सशक्तीकरण व अन्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या युवारंग बहुउद्देशीय संस्था, आरमोरी तर्फे दि.१२ मे २०२४ ते २६ मे २०२४ पर्यंत नि:शुल्क समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कराटे,क्रिकेट, कबडी, खो-खो ,योगा,चित्रकला, सेंद्रिय शेती व आयुर्वेद,वन्यजीव व पर्यावरण संरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. या समर कॅम्प चा समारोप सोहळा दि.२६ मे २०२४ ला सायंकाळी ८:०० वाजता स्वामी विवेकानंद विद्यालय, आरमोरी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणुन सर्पमित्र व वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था, आरमोरी चे अध्यक्ष देवानंद दुमाणे तर अध्यक्ष म्हणून सामाजिक विचारवंत व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक विलास गोंदोळे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी कन्या विद्यालय, आरमोरीचे मुख्याध्यापक प्रकाश पंधरे , युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष राहुल जुआरे , गडचिरोली जिल्हा रक्तदाता समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत , युवारंग चे कराटे प्रशिक्षक राजु अतकरे ,योग प्रशिक्षक धनराज कांबळे ,सामाजिक विचारवंत गोपाल ठवरे,सामाजिक कार्यकर्ते रामहरी वाडगुरे ,सामाजिक कार्यकर्त्या साक्षीताई कुंभारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन,माल्यार्पण व विनम्र अभिवादन करून झाली.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक देवानंद दुमाने यांनी युवारंग संघटनेचे कोरोना कालखंडातील व विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरोवोल्लेख केला.तर विलास गोंदोळे यांनी युवारंग हे महाराष्ट्रातील संत,समाजोध्दारक महापुरुष यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत असलेले व समाज परिवर्तनाच्या चळवळीत अग्रेसर असलेले संघटन असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.तर मुख्याध्यापक पंधरे यांनी युवारंगने बालक, पालक व विद्यार्थी यांच्यात समन्वय साधून समर कॅम्प यशस्वी केल्याबद्दल प्रशंसा केली.तसेच प्रशांत दोनाडकर, रामहरी वाटगुरे, गोपाल ठवरे, चारूदत्त राऊत यांनी युवारंगच्या कार्याची स्तुती केली.
युवारंगला नेहमी सहकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते साक्षीताई कुंभारे, कराटे प्रशिक्षक राजू अतकरे व योग प्रशिक्षक धनराज कांबळे आदींचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सहृदय सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी विविध नृत्य ,कराटे प्रात्यक्षिक ,विविध महापुरुषांच्या इतिहासावर वेषभूषा साकारून भाषण सादर केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात राहुल जुआरे यांनी युवारंग संघटनेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा लेखाजोखा अत्यंत समर्पक शब्दांत मांडला.तर बहारदार सुत्रसंचालन युवारंग चे सदस्य स्पप्नील जुआरे यांनी व आभार शुभम वैरागडे यांनी मानले.
कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवारंग चे सदस्य रोहित बावनकर,मनोज गेडाम ,पंकज इंदूरकर, लीलाधर मेश्राम,आशुतोष गिरडकर ,अंकित बन्सोड, महेंद्र मने,राकेश सोनकुसरे,शुभम वैरागडे ,सुमित खेडकर,श्रीराम ठाकरे, उमेश पिंपळकर, दीपक ठाकरे, विशाल चौके, प्रेम चौके,सूरज ठाकरे ,गोपाल नारनवरे,गुरुदेव दुमाणे, मंगेश कांबळे , नलेश खेडकर,नैतिक वासेकर, प्रथमेश साळवे यांनी अथक परिश्रम घेतले.








