विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
पळस गाव ( आरमोरी):
आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील ईश्वर केवळराम करांकर हे येथे लग्नसमारंभासाठी आले होते.लग्नसमारंभातील जेवण आटोपून दिनांक १६मार्च२०२४ च्या रात्रौ 10 वाजता आरमोरीस जाण्यास निधाले असता पळसगाव व पाथरगोटा दरम्यान वळणावर दुचाकीचे संतुलन बिधडल्याने दुचाकी रस्त्यावरील झाडाला आपटून त्यात ते मरण पावले.
ते जवळपास 43 वर्षाचे होते.वैरागड येथे शिवाजी हाय्कूलमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
त्यांचे मागे पत्नी,मुलगी आईवडील,भाऊ बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या अपधाती जाण्याने गावांतील व परिसरातील जनता हळहळ व्यक्त करीत आहे.
—————————————-
🙏💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
परमेश्वर या दु खातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना देवो तसेच त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.💐🙏💐
*आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत.
ईश्वर सारखा सुस्वभावी, तरूण मित्र काळाने आमच्यातून हिरावून घेतला आहे.ही अतिशय दुःखद व मनाला चटका लावणारी घटना आहे.
✍️🎙️ विलास गोंदोळे, संपादक, विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा








