सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांनी केले नेतृत्व व दिले निवेदन
उपविभागीय अभियंता यांनी दिले वीज पुरवठा वाढविण्याचे आश्वासन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):तालुक्यातील शेतातील कृषी पंपाच्या विविध समस्या साठी शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनी कार्यालय आरमोरी येथे धडक देऊन
आरमोरी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या कृषि पंपाच्या कमी विद्युत दाबासह विविध समस्या समस्या सोडविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात आरमोरी उपविभागीय अभियंता बागुलकर विज वितरण कम्पनी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यावेळी आंदोलनकर्ते शेतकरी, नेतृत्व व उपविभागीय अभियंता यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.यात विद्युत पुरवठा तत्काळ वाढविण्याचे आश्वासन उपस्थित वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंता यांनी उपस्थित आंदोलनकर्त्या शेतकरी वर्गासमक्ष दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आरमोरी तालुक्यातील या वर्षात शेतकऱ्यांनी उसने उधार करून नदी, विहिरी, नाल्यावर पळसगाव, जोगीसाखरा, वनखी, चामोर्शी, वासाळा, ठानेगाव, डोंगरगाव, कासवी, आष्टा, रामपूर, शंकरनगर, पाथरगोटा, सह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कृषि पंपाच्या भरवशावरउन्हाळी धान पीक घेण्यासाठी सुरवात केली .यात काहींचे रोवणे झाले तर काहींचे रोवणे कृषि पंपाचे विद्युत कमी दाबाने प्रवाह होत असल्यामुळे खोळंबल्या आहेत. तसेच दिवसभर मोटार सुरू ठेऊनही दिवसाला एक बांधीचे क्षेत्रफळ भिजत नाही, तसेच मोठ्या प्रमाणात रोवलेले धान पीक मरत असल्यामुळे वारंवार विद्युत कमी दाबाची समस्या निर्माण होत असते.सदर बाब वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता याकडे कर्मचारी कानाडोळा करीत आहेत.तसेच अजून पर्यंत वीज समस्या निकाली निघाली नाही. तसेच काही ठिकाणी आठ तास भारनियमन आहे. अनेक ठिकाणी कमी विद्युत दाबाची समस्या असल्यामुळे शेतकरी पीक लागवड करुनही उत्पन्न घेऊ शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेला खर्च वाया जात आहे.शेतकरी वर्गावर कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करणेची वेळ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे वीज वितरण कंपनीने तत्काळ तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे विद्युत प्रवाह वाढविण्यात यावे व तालुक्यासाठी 132 केव्ही वीज ट्रान्सफार्मर मंजूर करून; मंजूर ट्रान्सफार्मर तत्काळ लावण्यात यावे. तसेच ८ तासावरुण १२ तास कृषी पंपाना विज पुरवठा करण्यात यावे अशा विविध मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी विज वितरण कम्पनी ला धडक देऊन विज वितरण कम्पनीचे उपविभागीय अभियंता बागुलकर यांना निवेदन दिले .
निवेदनावर उपविभागीय अभियंता बागुलकर यांनी कसलाही विलंब न लावता कार्यकारी अभियंता डोगरवार यांना दुरध्वनी करून माहीती दिली. यात विद्युत प्रवाह वाढण्यासाठी कॅफेशिटर प्रत्येक एरीयात लावून वीज वाढविण्याचा प्रयत्न करु तसेच नविन ट्रांसफार्मर चे प्रस्ताव वरीष्ठ पातळीवर गेले आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतर सदर काम केले जाईल तसेच अन्य मागण्यां शासनाकडे पाठपुरावा करु असे आश्वासन उपविभागीय अभियंता बागुलकर यांनी सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम याच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांना दिले.
यावेळी चामोर्शी मालचे सरपंच ज्ञानेश्वर धारणे, वामन निबोळ, विजय डोकरे, नंदकिशोर मने, चंद्रकांत जुआरे, अनंता सरसरे, व्यंकटेश टिचकुले ,नितीन मने, मच्छिंद्र मेश्राम ,कातीक मातेरे, संतोष कांबळी, धुव्रबाळ धोटे, राजेंद्र पिपरे, रविंद्र थोरात, पुरुषोतम वैध ,संदिप आठवले, नामेशश्वर सहारे, जगदिश पिपरे यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.








