आरमोरीत सुवर्णकार समाज करणार ‘कृष्णलिला फेम’ नाट्यकलावंताचा सन्मान!

266

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी (जिल्हा गडचिरोली): सोनार समाज शाखा आरमोरी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दिनांक २७फेब्रुवारी २०२४ रोज मंगळवारला कृष्णलीला फेम नाट्यकलावंत उमेष हर्षे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

नाट्यकलावंत उमेष हर्षे यांनी कलेचे माहेरघर असलेल्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथे प्राथमिक शिक्षणासोबतच अभिनयास प्रारंभ केला. त्यावेळेसचे आघाडीचे कलाकार माजी न्यायमूर्ती तथा कलावंत ज्ञानदेवजी परशुरामकर, एडवोकेट परशुराम नाकाडे, सामाजिक विचारवंत धनंजय पाटील नाकाडे यांच्या तालिमित त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. त्यानंतर त्यांनी 2009 ला सुपरहिट ‘कृष्ण लीला’ या लघु नाटकाची निर्मिती केली व त्याचा पहिला प्रयोग आरमोरी येथील दीपकजी बेहेरे यांच्या वाड्यात संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त रंगमंचावर सादर केला. तेव्हापासून या नाटकाचे अनेक ठिकाणी सर्वाधिक प्रयोग झाले आहेत. कृष्ण लीला नाटकातील त्रेतायुग व द्वापार युगातील वर्णन केलेले प्रसंग त्यांनी हुबेहूब रेखाटले आहे.त्यांच्या या विशेष कलासक्त अभिनयामुळे कृष्ण भूमिकेसाठी उमेश हर्ष यांना विविध सेवाभावी संस्था व प्रतिष्ठानच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार, 2023 चा प्रतिभा सन्मान अवार्ड नागपूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडचिरोली तर्फे नाट्य कलावंत सन्मान पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.

त्यांच्या होत असलेला सन्मानाबद्दल विधायक दीपस्तंभ न्यूजचे संपादक विलास गोंदोळे, महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष धनपाल कार, सराफा असोसिएशन आरमोरीचे अध्यक्ष विजयराव खरवडे, उपाध्यक्ष दीपकजी बेहेरे, श्री संत शिरोमणी महाराज सोनार समाज कार्यकारणी अध्यक्ष पंकज खरवडे, सरचिटणीस मदन काळबांडे ,महिला अध्यक्ष प्रीती गजपुरे ,संघटिका सविता खापरे, देसाईगंज नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष गोपाल चौधरी, आरमोरी निर्वाचन क्षेत्र कलाकार संघटना उपाध्यक्ष पुंडलिकराव नागपूरकर महाराज आदींनी अभिनंदन केले आहे.