पोकरा प्रकल्प संचालक यांची शिवनी (बुज.) येथे भेट व चर्चा

339

कृषी अधिकारी व एफपीओ संचालक उपस्थित

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):गडचिरोली जिल्ह्याचा नव्याने  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (POCRA) योजनेमध्ये समावेश झालेला आहे. योजनेशी संबंधित जिल्ह्याची माहीती जाणुन घेण्याकरीता काल दिनांक १६.१२.२०२३ रोजी आरमोरी तालुक्यातील मौजा – शिवणी बु.  येथे  प्रकल्प व्यवस्थापकिय संचालक (पोकरा) (भा.प्र.से.) डॉ. परिमल सिंग तसेच सहाय्यक प्रकल्प संचालक विजय कोळेकर यांनी भेट दिली.

ग्रीनगोंडवाना शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रगती तसेच कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. नवीन येऊ घातलेल्या पोकरा योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीला उपयुक्त असणाऱ्या योजना तसेच वैयक्तिक लाभार्थींना त्यांचे उत्पन्न वाढून राहणीमान उंचावण्यासाठी शेती विषयक गरजेचे असलेल्या योजनांविषयी चर्चा करण्यात आली.तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2022-23 अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या गोदामाची पाहणी केली. कंपनी राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल व कंपनीच्या वाटचालीबद्दल डॉ. परीमल सिंग यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी प्रकल्प संचालक (आत्मा) पी.एन. डाखळे ,   उपविभागीय कृषी अधिकारी वडसा तथा तालुका कृषी अधिकारी आरमोरी निलेश गेडाम , कृषी पर्यवेक्षक ए. आर. हुकरे, कृषी सहाय्यक एन. सी. कुंभारे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) महेंद्र दोनाडकर,  ग्रीनगोंडवाना शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक हेमराज खोब्रागडे, प्रशांत दर्वे, बळीराम राऊत, इत्यादी प्रामुख्याने  उपस्थित होते.