वाॅटर एटीएम मशीन अनेक दिवसांपासून बंद

235

नगर परिषद आरमोरीने तत्काळ सुरू करावी

युवारंगचे मुख्याधिकारी यांना निवेदन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):शहरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ व निर्मळ पाणी मिळावे यासाठी नगर परिषद, आरमोरी तर्फे  टिळक चौक मधील दुर्गा मंदिर समोर वॉटर ए.टी.एम. मशीन लावण्यात आली; मात्र सदर
वॉटर ए.टी.एम. मशीन दीड ते दोन  महिन्यापासूनच बंद अवस्थेत आहे. त्यातच नगर परिषद आरमोरी तर्फे शहरातील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न करता  दर १ दिवसा आड पिण्याचे पाणी नागरिकांना मिळते.त्यामुळे सदर वॉटर ए.टी.एम. मशीन लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना शुद्ध व निर्मळ पाणी नगर परिषद तर्फे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवारंग लोकहीत संघटना आरमोरीच्या वतीने मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

याप्रसंगी युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे ,युवारंग चे संघटक रणजित बनकर, आशुतोष गिरडकर , सदस्य चंदाताई राऊत ,विभाताई बोबाटे ,सुरेश मेश्राम उपस्थित होते.