आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

220

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा केला उपस्थितांनी संकल्प

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली ): जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळ आरमोरी व निर्ध़नराव पाटील वाघाये शिक्षण महाविद्यालय आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यशिक्षिका युगस्त्री सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक ३जानेवारी रोजी प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आदरांजली अर्पण केली.

स्त्री शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अहोरात्र काम करत बहुजनांच्या हृदयात कायमचे वास्तव्य केले आहे.सामाजीक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात महात्मा जोतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शैक्षणिक गंगा पोहचविली.तसेच समाज प्रबोधन करून समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले.स्त्रियांना सन्मानाचे जीवन जगण्यासाठी व समाजातील वाईट प्रथांचा बंदोबस्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले.विद्यालये ही समाजजागृतीचे व समाजक्रांतीचे माध्यम आहे हे ओळखून त्यांनी ‘शिक्षणातून विकास ‘हा मूलमंत्र दिला.एकंदरीत सावित्रीबाई व जोतीराव यांनी भारतीय प्रतिगामी समाजाच्या पुरोगामी मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी महत्वाचे कार्य केले.असे विचार उपस्थित पदाधिकारी यांनी व्यक्त केले.तसेच यापुढे समाजातील तळागाळापर्यंत सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्याचा संकल्प उपस्थित मान्यवरांनी केला आहे.

यावेळी कार्यक्रमाला जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे, मार्गदर्शक देविदास चेटुले, सचिव तथा विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, सहसचिव अंकुश गाढवे, संचालक ऍड.हिवराज बोरकर,प्रा.नलेश रहाटे, महाविद्यालयाचे कर्मचारी कोहाडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी सेवा मंडळाचे सेवाधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.