जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय गडचिरोलीचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली : भारताचे पहिले शिक्षण महर्षी तथा कृषी रत्न व ओबीसींना आरक्षण मिळावे याकरिता झटणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती जगद्गुरु तुकोबाराय वाचनालय गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात आज दिनांक २७डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव गोविंदराव बानबले , सदस्य दादाजी चापले, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष शालिग्राम विधाते, कार्याध्यक्ष डाॅ.सुरेश लडके ,सचिव कुत्तरमारे, ओ.बि.सी.महासंघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी , संघटक चंद्रकांत शिवनकर व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग घोटेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकातून कुत्तरमारे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाकला . गोविंदराव बानबले यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर पंजाबराव देशमुखांमूळे विदर्भातील शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला तसेच कृषीमंत्री असतांना त्यांनी विदर्भातील शेतीच्या विकासासाठी मोलाचे कार्य केल्याचे सांगीतले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच उपस्थितांनी सहकार्य केले.









