सामाजिक कार्यकर्ते व महिलांचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): स्थानिक संत रविदास महाराज यांचे मंदिरात आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते रणजितदादा बनकर व गडचिरोली चर्मकार संघटनेचे सदस्य विनायकराव पेलणे यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांचे उपस्थित लोकोध्दारक संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक १९डिसेंबर रोजी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना रणजितदादा बनकर म्हणाले की, संत, महापुरुष हे कोणत्याही जातीपातीचे नसून ते लोकोध्दारक व परिवर्तनवादी असतात.अशा महान संतांचे संदेशाचे प्रसार करून स्वतः वाटचालीसाठी तत्पर राहणे हीच संतांना खरी आदरांजली ठरेल असे भावोद्गार काढले.
तसेच विनायकराव पेलणे यांनी संत रविदास महाराज यांनी भारतभर समाजाला अज्ञान व अंधश्रद्धा यापासून परावृत्त केलेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रणजितदादा बनकर, चर्मकार समाजाचे अध्यक्ष पुंडलिक पेलणे ,उपाध्यक्ष राजू वादिकर,सचिव नारायण वाढई,विनायक पेलणे,किसन वाढई, गुणवंत बावणे,रामदास वाढई,चंदू वादीकर तसेच आरमोरी परिसरातील चर्मकार महिला व पुरुष आदी उपस्थित होते.









