यंदाही आरमोरीकरांची सामुहिक तुलसी विवाहाची परंपरा कायम!

243

नेहरू चौकातील नागरिकांचा पुढाकार

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): येथील अष्टविनायक गणेश उत्सव मंडळ आरमोरीचे वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंदिराचे आवारात नेहरू चौकातील नागरिकांनी, महिलांनी तुळशीवृंदावन एकत्रित करून सामुहिक तुलसी विवाह सोहळा उत्साहात दिनांक २५नोव्हेंबरला साजरा केला.

गत दहा वर्षांपासून नेहरू चौकातील अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी व मोहल्लातील नागरिक एकत्र येत असतात.सर्व घरातील तुळशीवृंदावन गणेश मंदिराचे आवारात जमा केली जातात.सर्व तुळशीवृंदावनांना सुशोभित केले जाते.तसेच तुलसी विवाह प्रथेनुसार सर्व पुजाविधी पार पाडले जातात.त्यानंतर तुलसी मंगलाष्टके म्हणून व तुलसी आरती, गणेश वंदना करून सामुहिक तुलसी विवाह सोहळा उत्साहात साजरा केला जातो.तुळशी विवाहानंतर समाजबांधव महाप्रसाद म्हणून भोजनाचा आस्वाद घेत असतात.तसेच पुढील वर्षी सामुहिक तुलसी विवाह सोहळ्याला एकत्रित येऊन बंधुभाव व सामाजिक एकोपा कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहा असा संदेशही याप्रसंगी देतात व एकमेकांचा उपस्थित व-हाडी मंडळी,आयोजक, मोहल्लातील निवासी निरोप घेतात.अशारितीने आजही कार्तिक एकादशी पावनपर्वावर सामुहिक तुलसी विवाह सोहळ्याची परंपरा कायम राखली आहे.

या सोहळ्यासाठी प्रफुल्ल मोगरे, आकाश हेमके, गणेश तिजारे,सौरभ हेमके, नितिन जोध, योगेश देविकर,अजय हेडाऊ,साई घाटूरकर, स्वप्नील हेमके,सुरेश हेमके,चंदु आकरे, पंकज नारनवरे, अक्षय हेमके,शुभम पेंदाम,वेंदात कापकर, प्रशांत तिजारे,सुमीत आंबोरकर,
चेतन तिजारे, अमोल धात्रक, विनोद आकरे, स्वप्नील गिरडकर, धनंजय तिजारे आदी मंडळींनी हिरहिरीने सहभागी होऊन सहकार्य केले.