श्रीमती जानकाबाई राऊत कालवश

126

💐🙏💐विधायक दिपस्तंभ वृत्तसेवा

आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): नजीकच्या नवीन वघाळा परिसरातील शेतकरी कुटुंबातील सुपरिचित श्रीमती जानकाबाई माधोजी राऊत यांचे वृद्धापकाळाने काल दिनांक १७ मे २०१७ ला निधन झाले.मृत्युसमयी त्या ८० वर्षाच्या होत्या.

 

त्यांच्या पश्चात मुलगा,पुतणे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

 

त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक १८ मे ला सकाळी १०.३० वाजता वैनगंगा नदीचे घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

————————————-

💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

————————————-

📄शोकसंदेश

श्रीमती जानकाबाई माधोजी राऊत या मातोश्री अत्यंत मनमिळावू, स्पष्ट तसेच रोखठोक स्वभावाच्या होत्या.तसेच त्या अंतःकरणाने अंत्यत हळव्याही होत्या.सतत शेती कामात व्यस्त राहणे हा त्यांचा आवडता छंद होता.आज त्यांच्या देवाघरी जाण्याने राऊत कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहे.या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर त्यांना देवो.हिच विलास गोंदोळे व विधायक दिपस्तंभ न्यूज तर्फे गुरुदेव चरणी विधायक प्रार्थना 🙏

जय गुरुदेव 🙏 ॐ शांती.. शांती.. शांती