गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार- उद्योजक मेळावा

63

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली,दि.24: गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, दे-आसरा फाऊंडेशन, आणि इनक्यूबेशन कम बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठ, कोटगल रोड गडचिरोली येथे दिनांक 25 मार्च 2026 रोजी 11.00 वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार / उद्योजक मेळावा, आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर रोजगार/उद्योजक मेळाव्यामध्ये डॉ. रविंद्र अहेर (बिझनेस ग्रोथ स्ट्रेटजिस्ट), अमर नायसे (ब्रेन ऑप्टीमायझेसन कोच) व अनिरूदध आठवले (मॅटर इनफेड-IIM नागपूर) उपस्थित राहणार आहेत. तसेच उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करणार असून विविध नामांकित कंपन्या सुध्दा सहभागी होणार आहेत.

सदर मेळाव्याकरिता ईच्छुक असलेले उमेदवारांनी उद्योजकांनी उपस्थित राहून रोजगार/उद्योजक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.

0000

Previous article“Yes we can end TB”:Led by Govt. Of Maharashtra powered by Janbhagidari “
Vidhayak Deepstambha
विधायक दीपस्तंभ ऑनलाइन वेबसाईट ,न्यूज ब्लॉग आणि यूट्यूब चॅनल आपल्या परिसरातील प्रत्येक घटना , वास्तव टिपणा - या निःपक्ष बातम्या , काही घटनांचे लाईव्ह कव्हरेज अपटेड न्युज ब्लॉग समाजकारण , राजकारण , साहित्य , नाटक , सिनेमा , पुस्तक , लेखक , कलाकार , ग्लोबल ते लोकल, अर्थ , व्यापार , फॅशन यावर प्रकाश टाकणार. या बातम्या आपल्या मोबाईलवर देणारे हे न्यूज चॅनेल आहे . वेळोवेळ