प्रख्यात समाजसेविका शालिनीताई गेडाम यांचे देहावसान

219

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त तसेच आनंद शिक्षण संस्थेच्या संस्थापक उपाध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई बुधाजी गेडाम (वय ७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ब्रम्हपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

शालिनीताई गेडाम या महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शशिकांत गेडाम व आनंद शिक्षण संस्थेचे सचिव अजय गेडाम यांच्या मातोश्री होत. शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर उल्लेखनीय कार्य केले. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध उपक्रमांतून मोलाचे योगदान दिले.
अतिशय शांत, संयमी व मनमिळावू स्वभावामुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या.

त्यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक ७ जानेवारीला दुपारी १२ वाजता गाढवी नदीतीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


💐शोक संदेश  🙏

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तनवादी, सुपरिचित आदर्श शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या शालीनीताई गेडाम यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व महिला चळवळीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.मातृतुल्य मार्गदर्शक व्यक्तीमत्व हरपले आहे.

आदरणीय काकूस विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏💐

सन्माननीय गेडाम कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.या दुःखातून सावरण्याचे बळ ईश्वर त्यांना देवो हीच प्रार्थना 🙏

🎤✍️ विलास गोंदोळे, संपादक, विधायक दीपस्तंभ न्यूज