बगाजी बोरकर यांचे निधन
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली),दि.४ डिसेंबर: येथील सिताबर्डी परिसरातील रहिवासी बगाजी सखाराम बोरकर (८३ वर्षं) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजताचे सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आजच दुपारी १ वाजता गाढवी नदीचे तिरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.








