वाघाच्या बंदोबस्तासाठी देऊळगाव येथे चक्का जाम आंदोलन ६ डिसेंबरला

231

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):
देऊळगाव येथे दिनांक 6 डिसेंबर ला वाघाचा बंदोबस्त करा, शेतक-यांना वाघापासुन स्वसंरक्षण द्या तसेच हत्तीने केलेल्या नुकसानीची रक्कम वाढवा या व इतर मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन परिसरातील जनतेच्या वतीने करण्यात येणार आहे.

 

गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात जंगली हिंस्र प्राण्याचे माणसांवर हल्ले वाढलेले आहेत.आरमोरी तालुक्यातील मौजा देऊळगाव व इंजेवारी क्षेत्रात वाघाचे हल्ले वाढण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील एक महिन्यात वाघाचे चार घटना घडल्या आहेत. डोंगरसावंगी येथे एका महिलेवर वाघाने हल्ला केला पण ती बचावली. त्यानंतर 19 नोव्हेंबर ला मौजा देऊळगाव येथे दोन महिला वाघाचा हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आहेत.त्या नंतर लगेच 14 दिवसांत मौजा इंजेवारी येथील एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले.
यामुळे परिसरात जनतेत दहशतीचे वातावरण पसरले आहे.शेतकर्यांना शेतात जाऊन काम करणे अवघड झाले आहे. विविध भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांना सकाळी व्यायाम करणे अवघड झाले आहे.परंतु वनविभागाने अजुनही वाघाला पकडले नसल्याने शेतकरी, शेतमजूरांमध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे .
वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा,ज्या शेतकऱ्यांची वाघाचा अडचणी मुळे शेती पेरली नाही त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी देऊळगाव येथे रास्ता रोको आंदोलन व ठिय्या आंदोलन 6 डिसेंबरला होणार आहे.

या आंदोलनात बहुसंख्येने शेतकरी, शेतमजूर , जनतेनी सहभागी होण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव  अमोल मारकवार यांनी आवाहन केले आहे.