विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली): गत 17 वर्षापासून अविरत सेवा देणाऱ्या निःशुल्क नित्य योग वर्धापनदिन आरमोरी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दि.22 आॅक्टोंबरला साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गंगाधर जुआरे होते. तर उद्घाटक म्हणून पं. समितीचे माजी उपसभापती चंदु वडपलीवार तर पाहुणे म्हणून पतंजली चे प्रांतीय सदस्य सत्यनारायन अनमदवार, जिल्हा प्रभारी सत्यनारायन चकीनारपुवार, जिल्हा कोषाध्यक्ष मारोती राऊत, युवा जिल्हा प्रभारी धनंजय कांबळे, योग शिक्षिका साक्षीताई कुंभारे, सिंधुताई कोरडे उपस्थित होते.
सर्वप्रथमत: कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली.
याप्रसंगी मान्यवरांनी योग पतंजली चे उद्देश व कार्याविषयी विस्तृत माहीती दिली.
प्रास्ताविकातून योगगुरु चकीनारपुवार यांनी आरमोरी येथे पंतजली योगा सुरु करण्यामागील उद्देश स्पष्ट केले.तसेच त्याला शहरी भागात मिळत असलेला प्रतिसाद याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.तसेच विविध वयोगटातील नागरिकांनी, युवकांनी योगासने यांचे प्रशिक्षण घ्यावे व आरोग्य विषयक जागृकता निर्माण करावी असे आवाहन केले.
तर सुत्र संचालन संजय सातपुते केले.
यशस्वितेसाठी घनश्याम धकाते, भाष्कर नवघडे, रामचंद्र धकाते, नरेश नवघडे, लालाजी बुरांडे, व्यंकटेश धरत, चरणदास चापले, रमेश बोनमवार, उत्तरा शहारे, मिनाक्षी पानसे, ज्योत्स्ना नवघडे, प्राची नंदागवळी, स्वाती लाडे, वंदना कारकुरवार, अवती डुमरे, संध्या बेहरे, राऊत मॅडम तसेच इतर साधक वर्गाने केले.









