रंगोत्सव २०२५!

108

.…. सजली सिताबर्डी (आरमोरी) परिसरातील बाजारपेठ!

फोटो स्टोरी

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

होळी व शिमगोत्सव हा जणू काही सानथोरांचा ‘रंगात रंगूनी सा-या रंग माझा वेगळा ‘ म्हणण्याचा आनंदोत्सव ! अशा आनंदोत्सवात ‘तानापिहिजा ‘ रंग उधळत हा सण अधिक उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी आरमोरी ( सिताबर्डी ) परिसरातील दुकानदार बंधूंनी विविध प्रकारचे रंग, स्प्रे, पिचकारी,गन,पोंगा, रंगीबेरंगी मास्क, स्वस्त ते मस्त विविध आकारातील मुखवटे,लाल, शेंदरी,पिवळा,हिरवा,निळा गुलाल पाकीट विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत.रंगोत्सवासाठी सजलेल्या मनमोहक मिनी बाजारपेठेचे विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे यांनी टिपलेले छायाचित्र!