आज आरमोरीत श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा

174

विविध कार्यक्रमांचे आयोजन

समाजातील मान्यवरांचा होणार गौरव

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी- श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ सोनार समाज शाखा आरमोरीच्या वतीने दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ला स्थानिक साई दामोदर मंगल कार्यालयाच्या सभागृहात नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ९.०० वाजता श्रीराम मंदिर देवस्थान आरमोरी येथून श्री संत नरहरी महाराज यांच्या फोटोची भव्य मिरवणूक, शोभायात्रा व कलश यात्रा निघणार असून दुपारी ११.०० वाजता समाजातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे.

दुपारी १२.०० वाजता उद्घाटन सोहळा होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पवनी येथील सनदी लेखापाल गौरव बांगरे तर अध्यक्षस्थानी गोंदिया जि. प.चे उपाध्यक्ष सुरेश हर्षे राहणार आहेत.तर प्रमुख अतिथी म्हणून आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी,आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास गवते, नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार,आमगाव येथील ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुभाष यावलकर, सराफा असोसिएशन आरमोरीचे अध्यक्ष विजयराव खरवडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सोनार समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.तसेच समाजातील १०वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तर दुपारी ०१.०० वाजता महिलांसाठी बलून फोड स्पर्धा, दुपारी २.०० वाजता १५ वर्षे वयोगटातील सोनार समाजातील मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, दुपारी ३.०० वाजता ०२ ते १० वर्षापर्यंत मुलामुलींसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे.सायंकाळी ५.०० वाजता भजन, पूजन व गोपालकाला, सायंकाळी६.०० वाजता महाप्रसाद व सायंकाळी ७.०० वाजता समाजातील मुलामुलींसाठी नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास सोनार समाजातील सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सोनार समाज शाखा आरमोरीचे अध्यक्ष पंकज खरवडे, सचिव मदनकुमार काळबांधे,महिला अध्यक्ष प्रीती गजपुरे, युवा अध्यक्ष अंकुश खरवडे, विनोद बेहरे,दिलीप श्रीरंगे,ओंकार इन्कने, प्रफुल खापरे,चंदा खापरे,निर्मला काळबांधे,सुनीता काळबांधे, कविता बेहरे, सविता खापरे,नंदा भरणे यांनी केले आहे.