माळी समाज संघटनेच्या कार्यकारिणीचे पुनर्गठन

171

समाजातील सदस्यांची विविध पदांवर केली निवड

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: स्थानिक गडचिरोली येथे दि.15 सप्टेंबर 2024 रोजी रविवारला फुले दापंत्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष पुरण पेटकुले यांचे अध्यक्षतेखाली बैठकीत जिल्हा माळी समाज संघटना, गडचिरोली कार्यकारिणीचे पुनर्गठन करण्यात आले.

यावेळी माजी सचिव रमेश जेंगठे यांनी संघटनेची निर्मिती, घेतल्या गेलेली विविध उपक्रमे, संघटनेचा मागील जमाखर्च उपस्थितांसमोर सादर केला. त्यानंतर उपस्थित सर्व तालुका प्रतिनिधींनी पुढे येऊन संघटन कसे असावे, कुणाला पदे द्यावित याबाबत चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी संजय लेनगुरे व मंगलदास कोटरंगे यांनी आपल्या संघटनेची उत्कृष्ट काम करणारी संघटना म्हणुन आजुबाजुच्या जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात दखल घेतली गेली आहे. त्यामुळे अनावश्यक टीकेकडे लक्ष न देता असेच कार्य करत राहायला हवे असे मत व्यक्त केले.

त्यानंतर पुन:गठणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली. उपस्थितांनी चर्चा करुन सर्व मान्यतेने अध्यक्षपदी देवराव मोहुर्ले यांची तर कार्याध्यक्ष म्हणून हरिदास कोटरंगे,उपाध्यक्ष सुखदेव जेंगठे, अभिमन्यु निकुरे, मनोज सोनुले तसेच सचिवपदी राजेंद्रआदे,सहसचिव मंगलदास कोटरंगे,कोषाध्यक्ष नरेंद्र निकोडे,सहकोषाध्यक्ष प्रविण मोहुर्ले व सल्लागार म्हणून भिमराज पात्रीकर, दशरथ आदे, फुलचंद गुरनुले यांची तसेच जिल्हा संघटक म्हणून वामन गुरनुले, महेंद्र मोहुर्ले, योगेश सोनुले व
प्रसिध्दी प्रमुख गिरीष व पुरुषोत्तम लेनगुरे,महिला प्रतिनिधी,ज्योती जेंगठे, संध्या भेंडारे आदींची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी मंगला मांदाडे, सुमन गुरनुले, अल्का गुरनुले, मनिषा निकोडे, संगिता निकोडे, नेताजी गावतुरे, शंकर चौधरी, अशोक शेंडे, रंजीत बनकर, मधुकर ठाकरे, रेवतीनाथ कावळे, निलकंठ निकुरे, बोरुले व वाडगुरे सर, संजय लेनगुरे, मंगलदास कोटरंगे, इ. विविध तालुक्यातुन आलेले महिला व पुरुष पदाधिकारी व जागरुक बांधव मोठ्या संख्येने हजर होते.

सदर सभेचे संचालन व आभार अशोक मांदाडे यांनी केले.