जगतगुरु संत तुकोबाराय यांचे विवेकरूपी विचारधन घराघरात पोहचविणार

765

पदाधिकारी व सेवाधिकारी यांनी केला संकल्प

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे वतीने आज दिनांक २फेब्रुवारी २०२४रोजी नियोजित संत तुकाराम महाराज विचारपीठाचे स्थळी संतशिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांची ४१६वी जयंती समाजबांधवांचे उपस्थित उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी सर्वप्रथमता वारकरी मालिकेतील बहुजन कल्याणकारी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले.तसेच सौ.भुनेश्वरी गोंदोळे यांनी ‘आरती तुकारामा’ चे गायन केले व उपस्थित सर्व समाज बांधव , भगिनींनी विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाला जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे कोषाध्यक्ष शंकरराव बोरकर, संचालिका लक्ष्मीताई मने, देविदास चेटुले यांनी संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे विचारकार्य, अभंगगाथा, संत व भोंदू यांतील फरकावर संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून केलेले प्रहार, भविष्यात जीवनात प्रगती व आध्यात्मिक डोळस रूची याबद्दल विचार व्यक्त केले.

तसेच संत तुकाराम महाराज यांचे विवेकरूपी विचारधन घराघरात पोहचवून सर्व समाजातील बांधवांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा संकल्प यावेळी केला.

यावेळी कार्यक्रमाला जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे सेवाधिकारी सौ.तुळसाबाई बोरकर,सौ.भुनेश्वरी गोंदोळे,सौ. जयश्री रवी मने,सौ.रत्ना बोरकर, नगरसेविका गीताताई सेलोकर,सौ.लक्ष्मीताई मने, काशिनाथ पोटफोडे, विलास गोंदोळे, अंकुश गाढवे,शंकरराव बोरकर, वामनराव शेंडे, वामनराव भोयर, देविदास चेटुले, नानाजी चोपकार,विजय गोंदोळे, महेंद्र शेंडे,रवी मने, मधुकर राघोर्ते, विलास पोटफोडे, गणेश तिजारे,बंडोपंत डोकरे, मयूर सेलोकर, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन विलास गोंदोळे यांनी केले.तर आभार महेंद्र शेंडे यांनी मानले.

यशस्वीतेसाठी जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे सर्व सेवाधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांनी अथक परिश्रम घेतले.