आरमोरी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिर रंगरंगोटीसह विद्युत रोषणाईने सज्ज!

313

22जानेवारीला भव्य रॅलीचे प्रयोजन ! !

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):
अयोध्येत श्रीराममंदिरात दि.22जानेवारीला प्रभु रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.यापार्श्वभुमीवर आरमोरी परिसरातील रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसुन येत आहे.दरम्यान आरमोरीतील रामतलावाकाठी उभा असलेल्या एकमेव जुन्या श्रीराम मंदिरात रंगरंगोटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली.

तसेच 22जानेवारीला,पुजाअर्चा,धार्मिक विधी,भजन, दीपोत्सव,कार्यक्रमाचा विधीवत सोहळा चालणार आहे.तत्पुवी अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे,हा प्रसंग प्रत्येक हिंदुसाठी अतिशय महत्त्वाचा आहे,हे हेरुन आरमोरी शहरात अयोध्या निमंत्रणेच्या अक्षता वाटण्याचा कार्यक्रम हिंदुभावीक तथा विश्वहिंदु परिषद व्दारा श्रीराम मंदिरापासून सुरू केला. येथील सुप्रसिद्ध श्रीराममंदिराचे मागील वर्षात जिर्णोद्धार करण्यात आले.आता हे सुशोभित मंदिर मोठ्या डौलाने रामसागराच्या काठावर उभे आहे.मंदिराच्या एका बाजुला प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर तर दुसर्‍याबाजुला प्रसिद्ध दुर्गामाता मंदिर आहे.ही जागृत देवस्थाने आरमोरीकर व परिसरातील जनतेची श्रध्देची आशास्थाने म्हणून नावारूपास आली आहेत.

श्रीराम मंदिर परिसरात दोन्ही बाजूस हनुमान मंदिरे तर मंदिर तलावाचे मागे एकमेव श्री साई बाबाचे मंदिर दिसतो.एकंदरित हिन्दु मंदिर देवतांच्या वास्तुने नटलेल्या स्थळी , हे मंदिर रामभक्ताच्या मनोकामनांसाठी मोठे श्रध्दास्थान आहे.आरमोरी शहर सर्व धर्मीयासाठी सर्व धर्म समभाव व सलोखा जोपासण्यास लाभदायक ठरले आहे.

येत्या 22 जानेवारीला सकाळी 9 वाजता श्रीराम मंदिरापासून निघणाऱ्या रॅलीत सर्वांनी उपस्थित राहुन सहकार्य करण्याचे आवाहन श्रीराम उत्सव समितीने जनतेला केले आहे.

(टीप: वरील विशेष वृत्त विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्कला सर्वप्रथम दिले आहे; गडचिरोली जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार प्रा.गंगाधरराव जुआरे सर यांनी!
🌹सर,आपले संपादक,विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क तर्फे विशेष आभार!!🙏)