१०जानेवारीला नैनपूर येथे पुण्यतिथी महोत्सव

331

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , गोंविंदस्वामी व पंढरीनाथ महाराज यांना करणार अभिवादन

विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
वडसा (देसाईगंज):क्षोत्रीय ब्रम्हनिष्ठ सद्गुरु श्री गोविंद स्वामी महाराज सत्संग मंडळ नैनपूर वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री गोंविंदस्वामी महाराज व श्री पंढरीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक १०जानेवारीला नैनपूर येथे भव्य पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

त्यानिमित्ताने आज दिनांक १०जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात सकाळी ब्रम्हमुहुर्तावर ध्यान व परिपाठ, सकाळी ९ते ११.३० पर्यंत श्रींच्या पालखीची मिरवणूक,रामधून व भजन सोहळा तसेच १२ते ३वाजेपर्यंत हे.भ.प.श्री साईदास पंढरीनाथ महाराज नाकतोडे यांच्या अमृततुल्य वाणीतून प्रवचन होणार आहे.यानंतर गोपाळकाला, आरती व महाप्रसाद वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री गावकरी मंडळी नैनपूर व श्री क्षोत्रीय ब्रम्हनिष्ठ सद्गुरु श्री गोविंद स्वामी महाराज सत्संग मंडळ नैनपूर यांनी केले आहे.