तालुका पत्रकार संघ, आरमोरीचा पुढाकार
विविध मान्यवर व बहुसंख्य पत्रकार उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): तालुका पत्रकार संघ आरमोरीचे वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी (दि.६जानेवारी) मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहिली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री किसनराव खोब्रागडे शिक्षणसंस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे होते.तर विशेष अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमिष निमजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल सोमनकर तसेच पत्रकार विलास गोंदोळे,हरेन मडावी, रूपेश गजपुरे, सुनील नंदनवार,आकाश चिलबुले, महेंद्र रामटेके, अमरदीप मेश्राम,रूमदेव सहारे, भगवान बन्सोड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक मंडलिक म्हणाले की, पत्रकारिता ही आव्हानात्मक आहे.दररोज नवनवीन समस्या निर्माण होत असतात.त्या समस्या निर्भीडपणे सोडवून जनकल्याणाचे कार्य पत्रकारीतेत करावे लागते.आजच्या युगात समतोल पत्रकारिता करणे गरजेचे आहे.असे मत व्यक्त केले.
पत्रकार व जनतेचे कायमचेच ऋणानुबंध जुळले असतात.असेच ऋणानुबंध सर्वांशी जोडण्याची किमया पत्रकार मंडळीनी साधावी असे आवाहन कृउबाचे सचिव निमजे यांनी केले.तसेच अनिल सोमनकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील महत्वाचे प्रसंग सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे यांनी आरमोरी क्षेत्रातील पत्रकार व त्यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात राहून केलेली समाजपयोगी दैदिप्यमान कामगिरी याची प्रशंसा केली.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या काळातील पत्रकारिता व स्वातंत्र्योत्तर काळातील पत्रकारिता यातील तुलनात्मक बाबींचा उलगडा केला.वर्तमान काळात पत्रकारिता तेच्या माध्यमातून पत्रकारांनी लोकाभिमुख कार्य करून नावलौकिक मिळवावा असे आवाहनही यावेळी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.प्रशांत झिमटे यांनी केले.तर प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष दौलत धोटे यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार संघाचे सदस्य आकाश चिलबुले यांनी मानले.
यशस्वीतेसाठी तालुका पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच वन विभागाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.









