विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
किनवट : गोकुंदा येथील मथुरा व बंजारा समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई ज्योतीराव फुले यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बसपा नेते प्रा. डॉ. आनंद भालेराव हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजीक कार्यकर्त्यां सुनंदाताई पाटील हया होत्या.
याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना सावित्री माई यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली.सावित्रीमाई यांनी वंचित, उपेक्षित व मागासवर्गीय लोकांना शिक्षण देवून मुख्य प्रवाहत आणले. त्या पहिल्या शिक्षिका,सामाजिक परिवर्तनाच्या शिलेदार ठरल्या. त्यांच्या विचाराने मार्गक्रमण करून वाटचाल करावी व उच्च शिक्षित होऊन आपला उद्धार करावे असे विचार व्यक्त केले. सर्वांनी सावित्रीमाई च्या प्रतिमेस पुष्प हार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन अर्चनाताई येरवाल यांनी केले.तर आभार बादल तितरे यांनी मानले.
यावेळी विनय, आदर्श, राणी व सुमित येरवाळ यांनी विद्येची स्फुर्तीनायिका सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास अभिनय राठोड सह अनेक बालक, बालिका उपस्थित होते.
जय ज्योती, जय क्रांती च्या जय घोषणा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.









