महिला समुपदेशन केंद्रांसाठी प्रस्ताव आमंत्रित

79

11 जुलै पर्यंत मुदत

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: जिल्ह्यातील महिलांना समुपदेशनाच्या माध्यमातून सहाय्य मिळावे, या उद्देशाने महिला व बाल विकास विभागामार्फत दुसऱ्या टप्यातील महिला समुपदेशन केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. याअंतर्गत कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिरोंचा या तालुक्यांसाठी इच्छुक संस्थांनी 11 जुलै 2025 पर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

या प्रस्तावांसाठीच्या अटी व शर्ती नुसार सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या समुपदेशन केंद्रांना बाजूला ठेवून नव्या संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. एकाच संस्थेला फक्त एकच प्रस्ताव सादर करता येणार असून, त्या प्रस्तावात तालुक्याचे नाव स्पष्टपणे नमूद केलेले असणे आवश्यक आहे. समुपदेशन केंद्र सुरू करण्याबाबत संस्थेचा अधिकृत ठराव सादर करणे बंधनकारक आहे.

याशिवाय, संस्थेने नामनिर्देशित व्यक्तीचे नाव व आर्थिक व्यवहारासाठी अधिकृत प्रतिनिधीची माहिती प्रस्तावात नमूद करावी. संस्थेचा महिला व बाल कल्याण क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असावा आणि तो अनुभव अहवाल व छायाचित्रांसह प्रस्तावासोबत जोडावा लागेल. तसेच मागील तीन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल सुद्धा सादर करणे आवश्यक आहे.

प्रत्येक संस्थेने आपला प्रस्ताव तीन प्रतींत तयार करून तो जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे 11 जुलै 2025 पर्यंत सादर करावा. त्या तारखेनंतर प्राप्त होणा-या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी आणि अर्जाचे नमुने मिळविण्यासाठी संबंधित संस्थांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.

0000

फोटो साभार:मेटा एआय