विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली, दि.२०: संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडुन “सखी वन स्टॉप सेंटर” ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे.
सखी वन स्टॉप सेंटर या नावाने प्रसिध्द असलेली ही योजना १ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या निकषानुसार शारिरीक लेगोंक, भावनिक, मानसिक आणि आर्थिक शोषनाला बळी पडलेल्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसह सर्व महिलांना आवश्यक ती मदत सखी वन स्टॉप सेंटर च्या छताखाली दिल्या जाते.
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात केंद्र पुरस्कृत महिला व बाल विकास विभाग द्वारा संचालीत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली द्वारा आतापर्यंत ४६९ संकटग्रस्त महिला व मुलींना मदतीचा हात देण्यात आले आहे.
सखी वन स्टॉप सेंटर मध्ये एकावेळी पाच महिलांना राहण्याची, भोजन, चहा, नाश्ताची सुविधा आहे. किमान पाच दिवसाचा तात्पुरता निवारा तथा महिलांचे समुपदेशन, न्यायालयीन व पोलीस विषयक मदत, वैद्यकीय मदत अशा अनेक सेवा एका छताखाली देवून कौटूंबिक हिंसाचार, तनाव यासारख्या प्रकरणांचा या सेंटरद्वारा निपटारा करुन त्यांचे कुटूंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्या महिलांना व मुलींना सासरी, माहेरी किवा बाहेर छळ काढल्या जातो व ज्यांना पुनर्वसनाची गरज आहे. अशांना वन स्टॉप सेंटर द्वारा पुनर्वसीत करण्यात येते, विविध हिंसाचारातील पीडीत मुली व महिला ह्या कधी स्वतः, आई-वडील तर कधी पोलीस यंत्रणेद्वारा सखी वन स्टॉप सेंटरला दाखल होतात अशा महिला व मुलींना त्या-त्या संदर्भात आवश्यक समुपदेशन तथा सहाय्य करुन त्यांना पुढील जीवन सुकर करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात.
कुमारी मातांची प्रसुती, नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन तथा बहुमुल्य समुपदेशन ,कुमारी मातांची प्रसुती, पीडीतांना नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन, पीडीत मुलांना शाळेत व बाल सुधारगृहात दाखल करणे, मनोरुग्ण महिलांचे उपचारार्थ मदत व पुनर्वसन, घरगुती हिंसाचार व मतभेद असणाऱ्या पिडीत महिलांना समुपदेशन, कौटुंबिक समुपदेशन व पुनर्वसन अशा अनेक जबाबदाऱ्या सखी वन स्टॉप सेंटर च्या माध्यमातून पार पाडल्या गेल्या.
महिला हेल्पलाईन १८१ तक्रार
जिल्ह्यामधील महिला व मुलीनी आता पर्यंत महिला हेल्पलाईन १८१ वर ११ तक्रार नोंदवीले व त्यावर योग्य ती मदत करण्यात आली आहे. म्हणून सर्व महिलाना व मुलीना असे आवाहन आहे कि, छळ होत असल्याबाबतची तक्रार १८१क्रमांक वर संपर्क करावे. मुली व महिलांची काय प्रकरणे आहे वा वर सविस्तर विचारना केली जाते तसेच महिला व मुलीच्या स्वःगावी जाऊन वस्तुस्थिती तशी जाणून घेतली जाते व त्यावर समुपदेशन किवा कायदेशीर मदत करुन प्रश्न सोडविल्या जातो.
मा. जिल्हाधिकारी, अविश्यांत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कड्डू यांच्या मार्गदर्शनात एका छताखाली अनेक सुविधा सर्व संकटग्रस्त महिलांना उपलब्ध असल्याची माहिती सखी वन स्टॉप सेंटर च्या केंद्र प्रशासक प्रणाली बी. सुर्वे (प्र) यांनी दिली आहे.
संकटग्रस्त / पौडीत मुली व महिलांच्या मदतीला सदैव तत्पर असणारे सखी वन स्टॉप सेंटर च्या जनजागृती पर कार्यक्रमाच्या माध्यमातून घर, परिवार, समाज, नातेवाईक व अन्य प्रकारे दुःखी महिलांनी सखी वन स्टॉप सेंटरशी संपर्क करावा. अथवा प्रत्यक्ष भेट द्यावी व मदत घ्यावी असे आवाहन केंद्र प्रशासक प्रणाली बी. सुर्वे (प्र) तथा इतर सर्व कर्मचारी वर्गाने केले आहे.
—————————————-
संपर्क कुठे करावा 2
हेल्पलाईन क्रमांक: १८१
कार्यालय संर्पक क्र. ०७१३२-२९५६७५
वन स्टॉप सेंटर मोबाई क्र. ९४०४३५४५४३
पत्ता: जुनी धर्मशाळा इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली
—————————————-
0000









