५ जानेवारीला आरमोरीत ‘रन फॉर नारीशक्ती’!

263

शेकडो महिला धावणार, चालणार

अधिकाधिक महिलांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आयोजकांतर्फे आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्य दिनांक ५ जानेवारी २०२५ रोज रविवार ला सकाळी ७ :०० वाजता,गोटुलभुमी तहसिल कार्यालय जवळ वडसा रोड,आरमोरी येथे रन फॉर नारीशक्ती या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर स्पर्धा ३ गटात आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये ‘अ’ गट ३० वर्षावरील महिलांची( फास्ट वॉक) तीव्र गतीने चालण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे.ज्यामध्ये २०००,१५००,१००० प्रथम, दुतिय , तृतीय रोख रक्कम व क्रमांक ४ ते १० पर्यंत येणाऱ्या विजेत्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येईल.तर ‘ब’  गटात महिलांची ५ किमी. दौड स्पर्धा आयोजित केलेली आहे ज्यामध्ये प्रथम बक्षीस ३०००,२०००,१००० रोख रक्कम तर  क्रमांक ४ ते ६ पर्यंतच्या विजेत्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येईल.’क’  गटात मुलींच्या १४ वर्षा आतील वयोगटात ३ किमी दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये प्रथम बक्षीस ३००० दुतीय २००० तर तृतीय बक्षीस १०० व ४ ते ६ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार आहे.

तसेच शहरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीला बचत गटाच्या महिलांचा सन्मान व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला भगिनीनी उपस्थित राहण्याचे आवाहन रन फॉर नारीशक्ती मॅरेथॉन कमिटी, आरमोरी तर्फे करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी महेन्द्र मने 8698104357 ,रोहीत बावनकर 9834884960 , पंकज इंदुरकर 8999516920  यांच्याशी संपर्क करावा.