आरमोरीत विद्यार्थीनींनी केला बालिका दिन उत्साहात साजरा

174

आम्ही सावित्रीच्या लेकी’ उपक्रम राबविला

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी ( जिल्हा गडचिरोली):स्थानिक हितकारिणी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्याने ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’या उपक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला बालिका दिन म्हणून विद्यार्थीनींनी उत्साहात साजरी केली.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कु. अमृता बन्सोड तर मार्गदर्शक कु. अंकिता बन्सोड, कु. पूर्वा कवसें तसेच प्रमुख पाहुणे कु.तनु ठाकरे, कु. प्रियांका राऊत, कु. शारदा राऊत, कु. सलोनी मेश्राम व सावित्रीबाई फुले यांच्या वेषात कु. कशिश नागदेवते, कु. अनुष्का पाटील आदी विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय स्वयंशासनाप्रमाने स्वतः पुढाकार घेऊन केले होते.हे विशेष!

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तृप्ती खोबरे तर प्रास्ताविक श्रुती वनस्कर व आभार कु. वेदिका बोरकर यांनी केले.

कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य जे. फुलझेले, प्रा. कु. शेंडे, प्रा. मेश्राम, प्रा. प्रधान, प्रा. सहारे, प्रा. नैताम, प्रा. दोनाडकर, प्रा. सेलोकर, प्रा. म्हशाखेत्री, प्रा.राखाडे, प्रा. कु. सारवे यांनी सहकार्य केले.