डॉ. चित्रा जावंधिया यांना आय डिझाईन एक्सिलन्स अवार्ड

142

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते दिला सन्मान

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
देवळी (जिल्हा वर्धा):नागपूर येथे आयोजित आय डिजाईन एक्ससिलन्स अवॉर्ड मध्ये देवळीतील चित्रा जावंधिया यांना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते स्मृती चिन्ह देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

वास्तुशास्त्रातील ज्ञान, इंटेरिअर डिझाइनर, बिना तोडफोड ची वास्तू आणि लोगो डिजाईन च्या माध्यमातून संपूर्ण भारतात त्यांनी नावलौकीक मिळविलेला आहे. याचीच पोच पावती म्हणून त्यांना नागपूर येथे सन्मानित करण्यात आले.सामाजीक क्षेत्रातील माहेश्वरी महिला मंडळाच्या डॉ चित्रा जावंधिया या वर्धा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

पुरस्कार समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुक करताना सांगितले की, देवळी सारख्या छोट्या गावातून येऊन एक महिला सुद्धा वास्तूशास्त्रात तज्ज्ञ बनू शकते. आणि संपूर्ण भारतात आपलं नावलौकीक करू शकते.ही महिला जगतासाठी गौरवास्पद व प्रेरणादायी बाब आहे.

यावेळी डॉ चित्रा यांनी दैनंदिन जीवनात वास्तुशास्त्राचे महत्व पटवून सांगितले. संपूर्ण भारतात साइंटिफिक लोगो बनवणारे मात्र 100-150 वैज्ञानिक आहेत. त्यात पहिल्या 50 वैज्ञानिका मध्ये डॉ चित्रा जावंधिया यांचा समावेश आहे. घराची तोडफोड न करता वास्तुदोष कसा दूर करू शकतो या बदल त्यांनी आपले मत उपस्थितांसमोर व्यक्त केले.

त्यांच्या झालेल्या गौरवाबद्ल देवळीकर, वर्धा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.