आज आरमोरी येथे विदर्भ निर्माण संकल्प यात्रेचे आगमन

185

विदर्भवादी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आयोजकांतर्फे आवाहन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य विदर्भ मिशन २०२३अंतर्गत ‘विदर्भ मिळवू औंदा’ची विदर्भ निर्माण संकल्प यात्रेचे आगमन आरमोरी येथे आज दिनांक २डिसेंबर २०२३रोजी सायंकाळी सहा वाजता होत आहे.

यानिमित्ताने आरमोरी येथील नवीन बसस्थानक जवळील परिसरात सायंकाळी ६वाजता सभा होणार आहे.

सदर सभेला विदर्भवादी नेते अॅड. वामनराव चटप, शेतकरी नेते तथा देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे,विराआस महिला आघाडीच्या नेत्या रंजना मामर्डे, अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले, विदर्भवादी नेते मुकेश मासुरकर, अरूण केदार आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

विदर्भ निर्माण संकल्प यात्रा ३डिसेंबरला सकाळी ठाणेगाव,वासाळा,वनखी,चामोर्शी मार्गे वैरागड,करपडा,लोहारा,कुकडी,विहीरगाव, कोरेगाव,रांगी वरून गडचिरोली येथे पोहचणार आहे.
गडचिरोली येथे दुपारी ३ वाजता इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात सांगता समारोप कार्यक्रम सभा होणार आहे.

सदर सभेला विदर्भवादी व नागरिकांनी बहुसंख्येने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार हरिरामजी वरखडे, डॉ.रामकृष्ण मडावी,प्रा.राजकुमार शेंडे,नाकाडे आदी आयोजकांनी केले आहे.