रणजित बनकर यांच्या जन्मदिवसानिमित्य विद्यार्थ्यांना फळ वाटप
बहुसंख्य बालके व मित्रमंडळी उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी( जिल्हा गडचिरोली): सन १९८६ मध्ये आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील क्रिकेट या खेळातील उत्कृष्ठ क्रिकेटपटू ‘शाहरुख’ म्हणुन प्रसिद्ध असणारे व शेकडो युवकांना क्रिकेट,हॅन्डबाॅल, कबड्डी, कुस्ती चे धडे देणारे , नेहमी सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेणारे युवारंग चे सदस्य रणजित बनकर यांचा दिनांक २ नोव्हेंबर हा जन्मदिवस… या आपल्या जन्मदिवसानिमित्य त्यांनी कुठल्याही प्रकारचा झगमगाट न करता व केक वगैरे न कापता युवारंग च्या नि:शुल्क कराटे प्रशिक्षणात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फळ वाटप करून त्यांच्याशी संवाद साधत साध्या पध्दतीने साजरा केला.
त्याप्रसंगी राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे मुख्य प्रशिक्षक राजु घाटूरकर , युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंदजी दुमाणे, विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारूदत राऊत,फॅशन डिझायनर सुरेश मेश्राम,युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम,राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे संयोजक रोहित बावनकर ,युवारंग चे सदस्य लीलाधर मेश्राम, पंकज इंदूरकर, आशुतोष गिरडकर ,विभाताई बोबाटे ,राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे सहप्रशिक्षक राजु अतकरे, अंकित बन्सोड तसेच युवारंग चे सर्व सदस्य व कराटे प्रशिक्षणाचे विद्यार्थी उपस्थित होते.