जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे सेवाधिकारी सहभागी
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): तालुका नाभीक समाज आरमोरीचे वतीने नियोजित कार्यस्थळावर श्री संत नगाजी महाराज यांची पुण्यतिथी दिनांक ३०-१०-२०२३ रोजी साजरी करण्यात आली.
पुण्यतिथीनिमित्त जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष महेश तितीरमारे यांचे शुभहस्ते व मंडळाचे सर्व सेवाधिकारी यांचे उपस्थित श्री संत नगाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित समाजबांधवांना जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे मार्गदर्शक देविदास चेटुले, सचिव विलास गोंदोळे, संचालक मधुकर राघोर्ते यांनी श्री संत नगाजी महाराज यांच्या जिवनकार्यावर मार्गदर्शन केले.
यावेळी जगतगुरु संत तुकाराम महाराज सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष इंजि.राहुल तितीरमारे, सहसचिव अंकुश गाढवे, संचालक विजय गोंदोळे,डिमराज सपाटे तसेच नाभिक समाज मंडळाचे नानाजी चोपकार,अॅड.किशोर चोपकार, अरूण चोपकार, गणेश लांजेवार, विलास चोपकार,वनस्कर,फुलबांधे, चंद्रहास मेश्राम व राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चाचे जिल्हा सदस्य विनायक पेलणे, सुवर्णकार समाजभूषण पुरस्कार प्राप्त उमेश हर्षे आदी मान्यवर उपस्थित होते.