गडचिरोली जिल्ह्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बैठक उत्साहात

125

बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित

विविध बाबींवर विचारमंथन

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बैठक पक्ष कार्यालयात कॉम्रेड. जैराम जागळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीला नागपूरचे राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड. अरुण लाटकर प्रामुख्याने उपस्थित होते
.
सदर बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कॉ.अमोल मारकवार यांनी केले.

तर प्रमुख वक्ते कॉ.अरुण लाटकर यांनी पक्षाचा मुख्य उद्देश सांगत देशातील केंद्र व राज्य सरकार कराच्या नावानी जनतेला लुटण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. व या सरकार च्या विरोधात जन आंदोलन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
गावागावात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बांधणी करुन पक्ष वाढीसाठी व मजबूत करण्याचे या वेळी आवाहन करण्यात आले.

बैठकीला कॉ.विठ्ठल प्रधान,.दामोधर बारापात्रे,बाबुराव मोहुर्ले,उदाराम कोहाळे,विनोद राऊत ,राजु सातपुते, किसन राऊत, महेश दुमाने,गुरुदेव जराते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार कॉ.राजु सातपुते यांनी केले.