विदर्भवादी नेत्या रंजना मामर्डे यांचा सत्कार

151

विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

विदर्भ आंदोलन समितीच्या महीला प्रदेशाध्यक्ष,विदर्भ वीरांगना श्रीमती रंजनाताई मामर्डे यांचा महाराष्ट्राचे पुरोगामी विचारवंत हरी भक्त परायण रमेश पंत काळे महाराज यांच्या हस्ते दिनांक २३ जानेवारी २०२५रोजी जवरकर लॉन, अमरावती येथे एका भव्य समारंभात सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार प्राप्त प्राचार्य डॉ. एन. जी. बेलसरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य भास्करराव मोहोड, शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रमोदराव पाथरे, प्रा. दिलीपराव देशमुख, डॉ. पद्मा राजपूत, प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी काळे महाराज यांनी रंजना ताईंच्या विदर्भ मुक्ती लढ्याचा प्रेरणादायी संघर्ष सांगून त्यांचे निःस्पृह सेवाकार्य लवकरच पुस्तक रूपाने समाजासमोर येणार आहे. या पुस्तकातील प्रत्येक आंदोलन म्हणजे चळवळीत कार्य करणाऱ्यांसाठी एक परिपाठ असेल असे गौरवद्गार त्यांनी काढले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजपूत यांनी केले.

या कार्यक्रमाला अमरावतीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.