‘भाग मिल्खा भाग’ महामॅरेथॉनने फुलले आरमोरी शहर !
शेकडो धावपटू व नागरिकांनी घेतला प्रत्यक्ष सहभाग
युवारंग महापुरुष, क्रांतीकारी व आदर्श खेळाडूंचे विचार युवकांमध्ये रुजविणारे संघटन :- अशोक ठकराणी
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):- भारतीय सैनेचे महान आंतरराष्ट्रीय धावपटू फ्लाईंगसिख ,पद्मश्री कॅप्टन. मिल्खा सिंगजी यांच्या जयंतीनिमित्त युवारंग लोकहीत संघटना,आरमोरी तर्फे आज दिनांक २० नोव्हेंबर २०२३ ला सकाळी ७:०० वाजता श्री. छत्रपती शिवाजी चौक,वडसा-बर्डी टी पॉईंट येथे भाग मिल्खा भाग मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.तसेच धावपटूंना मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण लोकप्रिय रंजित फोटो स्टुडिओच्या भव्य प्रांगणात करण्यात आले.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणुन आरमोरी येथील उद्योजक अशोक ठाकराणी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडचिरोली वैद्यकीय अधिकारी डॉ.निळकंठ मसराम हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यालय आरमोरीचे मुख्याध्यापक प्रकाश पंधरे , विधायक दीपस्तंभ न्यूज नेटवर्क चे संपादक विलास गोंदोळे, सामाजिक कार्यकर्त्या चंदाताई राऊत,विभाताई बोबाटे, युवा योगाचार्य धनराज कांबळे ,डब्लु.सी.एल.चंद्रपूरचे अनिलजी तोरणकर , जेष्ठ महिला नागरिक छायाबाई जुआरे, युवारंग लोकहित संघटनेचे संघटक रणजित बनकर, मार्गदर्शक देवानंद दुमाने आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धा महिला व पुरुष अश्या दोन खुल्या गटात आयोजित केलेली होती .ज्यामध्ये शेकडो युवक व युवतींनी सहभाग घेतला.
हे ठरले विजेते
पुरुष गटात ६ किमी.दौड मध्ये प्रथम क्रमांक नागेश्वर संजय रसे ,चंद्रपूर याने तर द्वितीय क्रमांक दुर्योधन शेंडे चंद्रपूर याने पटकाविला तर तृतीय क्रमांक प्रकाश रमेश मिरी कुरखेडा या खेळाडूने पटकाविला. क्रमांक ४ ते १० पर्यंत येणाऱ्या विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले.ज्यामध्ये उज्वल चांदेकर ,कार्तिकदास काटेखाये ,विशाल रामटेके ,सौरभ कन्नाके, रोशन बोदलकर , शिवाजी गोस्वामी,
जय नंदनवार यांनी आपले स्थान कायम राखले.
तर महिलांच्या ३ किमी दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक आचल रमेश कडुकर चंद्रपूर हिने तर द्वितीय क्रमांक तेजस्विनी कामडे चंद्रपूर तर तृतीय क्रमांक वैष्णवी प्रभाकर नैताम चंद्रपूर यांनी पटकविले.
क्रमांक ४ ते १० पर्यंत येणाऱ्या विजेत्यांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले.
ज्यामध्ये दीक्षा देवाजी तिजारे ,वैशाली विलास मालेकर , कल्याणी राजेंद्र भरे ,रोहीनी अनिल जुआरे ,गायत्री नंदकिशोर कन्नाके,पूजा तुळशीदास अजवाले , उज्वला पांडुरंग सेलोकर या स्पर्धकांनी क्रमांक पटकाविला.
तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये ८० वर्ष वयाचे प्रभाकरजी रामपूरकर ,घनश्यामजी धकाते ,संजय सातपुते तर महिलांच्या खुल्या गटात ११ वर्षाच्या कु.समिधा संजय मने या चिमुकली ने ३ किमी. अंतर पार करत सर्वांची मने जिंकली.
सर्व विजेत्या स्पर्धकांना मेडल्स, प्रमाणपत्र,रोख व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले.
चोख बंदोबस्त व विविध सुविधा
स्पर्धेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये.याकरिता स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच आरमोरी पोलिसांनी ‘स्टार्ट ते फिनिश ‘ पाईंट पर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.
तसेच धावपटूंना कुठल्याही वैद्यकीय व्यवस्थेची गरज पडल्यास ती आबाळ होऊ नये म्हणून उपजिल्हा रुग्णालय आरमोरीने सुसज्ज रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केलेली होती.
तसेच धावपटूंसाठी स्टार्ट व फिनिश पाईंटवर एनर्जेल वाॅटरची व्यवस्था केलेली होती.
लक्षवेधक ‘युवारंग’ची प्रिंटेट ‘टी शर्ट’
युवारंग लोकहित संघटनेचे सर्वं सदस्यांनी परिधान केलेली ‘भाग मिल्खा भाग’ मॅरेथॉन स्पर्धा प्रिंटेट केलेली पांढरी शुभ्र ‘टी शर्ट’ नागरिक व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती.
*विजेत्यांनी केले आयोजकांचे अभिनंदन*
आरमोरी शहरात भरविण्यात आलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धांमध्ये विजयश्री प्राप्त केलेल्या धावपटूंनी युवारंग लोकहित संघटनेच्या सर्व पदाधिकारी व आयोजकांचे अभिनंदन केले.तसेच भविष्यात अशाचप्रकारे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे.यात आम्ही हिरहिरीने सहभागी होऊ अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संचालन व समारोप
सदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन चारुदत्त राऊत यांनी तर प्रास्ताविक युवारंग लोकहित संघटनेचे अध्यक्ष राहुल जुआरे यांनी केले. आभार आशुतोष गिरडकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवारंग चे सदस्य मनोज गेडाम ,रोहित बावनकर,लीलाधर मेश्राम, पंकज इंदूरकर, अंकित बन्सोड, प्रथमेश सारवे , सूरज नारनवरे ,यादव दहिकार ,अमोल दहिकार ,सुरेश मेश्राम, संजय वाकडे,देवेंद्र कुथे ,सौरभ जांभूळे ,आशिष रामटेके,निखिल शेरकुरे , शाम सावसाकडे,महेंद्र मने , विशाल चौके,अनिकेत हजारे, गौरव वासेकर,प्रेम चौके,नैतिक वासेकर , भुषण हजारे ,उमेश पिंपळकर ,दीपक ठाकरे, राजुजी अतकरे,राजु घाटूरकर ,ज्योतीताई बघमारे, आशाताई बोळणे, उमाताई कोडापे, महानंदा शेंडे यांनी अथक परिश्रम घेतले.