बहुसंख्य प्रशिक्षणार्थी व कार्यकर्ते उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): स्थानिक स्वामी विवेकानंद विद्यालय,आरमोरी च्या पटांगणावर युवारंग तर्फे नि:शुल्क कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २९-१०-२०२३रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडले.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राजमाता जिजाऊ कराटे ग्रुप चे मुख्य प्रशिक्षक राजु घाटूरकर तर सहउद्घाटक चंदाताई राऊत सामाजिक कार्यकर्त्या ,आरमोरी तसेच कार्यक्रमाचे
अध्यक्ष म्हणुन देवानंद दुमाने, अध्यक्ष वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी व प्रमुख अतिथी म्हणुन स्वयं रक्तदाता संघटना जिल्हा, गडचिरोली चे अध्यक्ष चारुदत्त राऊत ,युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम ,सामाजिक कार्यकर्ते रणजित बनकर, सामाजिक कार्यकर्त्या विभाताई बोबाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना देवानंद दुमाने यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाची गरज काय आहे व त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, शिस्त, समर्पण या बदल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन राहुल जुआरे यांनी केले. तर प्रास्ताविक मनोज गेडाम व आभार पंकज इंदूरकर यांनी मानले.
याप्रसंगी युवारंग चे सद्स्य व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.