२९आॅक्टोंबरपासून आरमोरीत युवारंग  तर्फे  नि:शुल्क कराटे प्रशिक्षण

230

 

महिला व मुलींच्या आत्मरक्षणासाठी उपक्रम

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप, आरमोरी तर्फे महिला व मुलींवरील होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी सातत्याने मागील 6 वर्षांपासून नि:शुल्क कराटे प्रशिक्षणाचे आयोजन आरमोरी शहरात केल्या जात आहे.  आतापर्यंत या प्रशिक्षणातून १००० मुली व महिला तर ५०० मुलांनी प्रशिक्षण घेतले आहे दि. २९ /१०/२०२३ रोज रविवार पासून २०२३ या वर्षातील कराटे प्रशिक्षणाची सुरवात होणार आहे.

या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना स्पंच, किक , काता , शत्रूपासून स्वताचा बचाव करणे , अती कठीण प्रसंगात शत्रुवर आक्रमण करणे , या बदल माहिती दिली जाणार आहे.

कराटे प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी 9834884960 ,9834169950  या क्रमांकावर किंव्हा लोकप्रिय रणजित फोटो स्टुडिओ, टी पॉईंट बर्डी येथे संपर्क करावा असे आवाहन युवारंग तर्फे मुख्य प्रशिक्षक राजू घाटूरकर यांनी केले आहे.