गडचिरोली बॅडमिंटन महिला व पुरुष संघांचे केले अभिनंदन!

159

नागपूर येथील स्पर्धांमध्ये सहभागी संघ

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली):धनवटे नॅशनल कॉलेज अजनी आणि मानकापूर स्टेडियम कोराडी रोड नागपूर येथे संपन्न झालेल्या नंदू नाटेकर मेमोरिल योनेक्स सनराईस इंटर डिस्ट्रिक्ट आणि स्टेट चॅम्पिनशिप बॅडमिंटन स्पर्धामध्ये(30सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2023 ) गडचिरोली डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन ने कर्तबगार संघाची निवड केली.सदर स्पर्धेत महिला संघ आणि पुरुष संघ सहभागी झाले.

या स्पर्धेतील पुरुष संघात मधुकर मीच्छा, ओम बोड्डावार, प्रेम भोयर, अमित सोनी, विवेक हटवार, अजय कर्माकर,संकेत लांपते, लोमेश लेनगुरे,प्रसाद वैरागडे, तन्मय खोब्रागडे यांनी सहभाग घेतला होता. तर महिला संघात काजल मडावी, शालू केशनवार,प्रियांका दवेकर,पूजा मंडल, रिया बाराई,रंजना दास, रेशमी सरकार यांनी सहभाग घेतला होता.

गडचिरोली डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन तर्फे संघाचे प्रशिक्षक म्हणून कुमारसानू मझुमदार यांना संधी देण्यात आली.या सर्वांचे जिल्हा असोसिएशन चे सचिव मुकेश नागपुरे, उपाध्यक्ष अॅड.अविनाश मुर्वतकर, अध्यक्ष चंद्रशेखर बोकडे आदींनी अभिनंदन केले.