दोन टप्प्यांतील क्रीडा प्रशिक्षण शिबीर

59

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा 

गडचिरोली,दि.१६: जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता दि. १२ ते २१ मे २०२५ पहिला टप्पा व दि. २२ ते ३१ मे २०२५ दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली, क्रीडा प्रबोधिनी, गडचिरोली व जिल्हा स्टेडीयम, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी ५.३० ते ८.०० व सायंकाळी ५.३० ते ८.०० या कालावधीत शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण शिबीरात १० वर्षावरील सर्व मुलामुलींना सहभाग घेता येईल. उपरोक्त प्रशिक्षण शिबीरात कुस्ती, व्हॉलीबाल, बॉक्सिंग, खो-खो, कबड्डी, मैदानी व बॉल बॅडमिंटन या खेळाचे प्रशिक्षण तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून देण्यात येईल. उपरोक्त शिबीरात सहभाग घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात नाव नोंदणी दि. ११/०५/२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत करणे आवश्यक आहे. उपरोक्त शिबीरात गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू/विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.

00000