जिल्हास्तरीय अॅथेलेट्टिक्स स्पर्धेत मिळविले डझनभर मेडल!

144

भारत फिझिकल अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी खेळाडूंचे घवघवीत यश 

राज्यस्तरीय स्पर्धेत निवड 

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा

गडचिरोली: महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन द्वारा दिनांक ०२ /०२/२०२५ रविवार ला एम.आय.डि.सी. ग्राउंड कॉम्प्लेक्स एरिया येथे सकाळी ७:०० वाजता आयोजित केलेल्या मैदानी स्पर्धेत विविध गटातील स्पर्धेत भारत फिजिकलच्या प्रशिक्षणार्थी खेळाडूंनी सहभाग दर्शविला व जिद्द ,चिकाटी, आत्यंतिक परीश्रम आदी गुणांच्या बळावर विजयश्री खेचून आणली.एकंदरीत डझनभर मेडल्सची लयलूट केली.

 

स्पर्धेत १४ वर्षातील मुलींच्या गटात भारत फिजिकल अकॅडमी, आरमोरी ची विद्यार्थिनी कुमारी साची संजय टिचकुले हिने ३०० मीटर व ८० मिटर दौड स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकाविला. तर १२ वर्षातील मुलींच्या च्या गटात कुमारी.आराध्या राजु चौके हीने ३०० मिटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला व १२ वर्षातील मुलींच्या गटात कुमारी.रुची सचिन वनवे हिने ६०मिटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकविला तर १२ वर्षातील गटात ,कुमारी.स्वरा मंगेश करंडे हीने लांब उड़ी स्पर्धेत प्रथम क्रमांक व गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक तर १२वर्षातील मुलांच्या गटात
कुमार.मयंक सोहन मरसकोल्हे याने ३००मिटर दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक,लांब उड़ी स्पर्धेत द्वितीय व गोळाफेक स्पर्धेत प्रथम पटकविला.तर १२ वर्षातील मुलांच्या गटात
कु.जनक गुरुदास देवतले याने ६० मिटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला, तसेच १० वर्षातील मुलांच्या गटात
कु.नावीन्य नितेश मेंढे याने ५०मिटर,१००मिटर स्पर्धेत द्वितीय पटकवित २३/०२/२०२५ ते २४/०२/२०२५ ला
कर्मवीर भाऊराव पाटिल महाविद्यालय,पंढरपुर,जिल्हा,
सोलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय पालक व भारत फिजिकल अकॅडमी,आरमोरी चे संचालक-प्रशिक्षक महेंद्र मने यांना दिले आहे.