श्री संताजी बहु.सेवा मंडळाचा पुढाकार
मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी उपस्थित
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
आरमोरी (जिल्हा गडचिरोली): तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहर विद्यालयात कार्यरत तथा श्री संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ आरमोरीचे सचिव देविदास नैताम यांची मुलगी डाॅ.निशिगंधा व मुलगा डाॅ.शुभम यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारा आयोजित पशुधन विकास अधिकारी भरती पदावर नियुक्ती झाली. याबद्दल मंडळाचे वतीने नैताम कुटुंबीयांचे सिताबर्डी परिसरातील निवासस्थानी भेट देऊन यशस्वी बहिण भावांचे आई वडीलासह अभिनंदन करण्यात आले.
याप्रंसगी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच बुधाजी किरमे, रामभाऊ कुरझेकर, पत्रकार विलास चिलबुले,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश जुआरे,सौ. प्रतिभा जुआरे,गजाननराव चिळांगे,प्रा.गंगाधर जुआरे,व मुलांची आई सौ.लताताई नैताम आदी उपस्थित होते.
श्री संताजी सेवा मंडळातर्फे केलेला आमचा सत्कार हा आमचे भविष्यातील वाटचालीसाठी मैलाचा दगड ठरेल व येणाऱ्या प्रतिभावंतांना प्रेरणादायी ठरेल असे भावोद्गार यशस्वी नैताम बंधू भगिनीने काढले.तसेच सेवा मंडळाचे पुनश्च आभार मानले.









