शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल राष्ट्रीय समाजगौरव पुरस्काराने सन्मानित

172

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना दिल्लीचा पुढाकार

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
गडचिरोली: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल गेल्या 30 वर्षा पासून जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त भागात गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी झटत असल्याने व जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा म्हणून शेकडो च्या वरती मोर्चे काढून अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याने त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन राष्ट्रीय मानव अधिकार संघटन दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय समाज गौरव पुरस्कार महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार बाबा आत्राम यांच्या हस्ते आज दिनांक १० /१२/२०२३ ला शिल्ड आणि मानपत्र देवून गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला खासदार अशोक नेते, गडचिरोली विधान सभेचे आमदार देवराव होळी, आरमोरी विधान सभाचे आमदार कृष्णा गजबे ,मानव अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महाराष्ट्र मानव अधिकार प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, राष्ट्रवादी नेते नाना भाऊ नाकाडे, पदमश्री पुरस्कार प्राप्त डॉ परशूराम खुणे तथा मानव अधिकार संघटना संघटनेचे पदाधिकारी आणि विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.