बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचा पुढाकार
विधायक दीपस्तंभ वृत्तसेवा
किनवट :-बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिनांक सहा (06)डिसेंबर 2023 रोजी बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रम दुपारी ठीक 2 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
यावेळी कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक तथा प्रमुख अतिथी म्हणून बसपा राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद, केंद्रीय कोर्डीनेटर डॉ.खा. अशोक सिद्धार्थ, केंद्रीय कोर्डीनेटर नितीनसिंग, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजने हे मार्गदर्शन करणार आहेत.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मनीषभाऊ कावळे, प्रा. प्रशांत इंगळे, हुलगेश चलवादी, ऍड. सुनील डोंगरे, प्रदेश महासचिव, सचिव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून बाबासाहेबाच्या विचार कार्याला अभिवादन करणार आहेत.
अशा अविस्मरणीय प्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जनतेनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बहुजन समाज पार्टीचे मराठवाडा विभाग प्रभारी प्रा. डॉ. आनंद भालेराव यांनी केले आहे.